भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – आज दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जयंती निमित्त भुसावळ मराठा समाज तालुका तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षा प्रमाणे ह्या वर्षी सुध्धा रक्तदान शिबिर, गोर गोरगरिबांना अन्नदान शिबिर ( खिचडी वाटप आणि फळ वाटप) तसेच थंड पेय वाटप आणि मराठा समाज तालुका दिनदर्शिका 2021 लोकार्पण सोहळा सुध्दा पर पडला.

उपस्थित मान्यवर मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण सिताराम पाटील, मराठा समाज तालुका उपाध्यक्ष श्रीकांत दिलीप बरकले, मा. नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक राहुल बोरसे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक ललित मराठे, एड. जास्वंती ताई भंडारी, राजमाता जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष ललिता कडू पाटील, छावा जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पवार, छावा भुसावळ तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे, मराठा समाज सहसचिव योगेश जाधव, जगदीश पाटील सर, नाना पाटील सर, पत्रकार गिरीश पवार,विजय कलापुरे, रुपेश पाटील, एकनाथ धांडे, किशोर पाटील, वैभव गुंजाळ, सुमित देसले, सचिन पाटील, ज्ञानेश्वर जगदाळे, पंकजराव हिंगणे, अनुराग साळुंके, पवन कडू पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.







