बार्शी नगरपरिषद स्वच्छ शाळा स्पर्धेचा निकाल जाहीर

barshi-swach-shala-purskar

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – ‘घनकचरा व्यवस्थापन जनजागृती’ मोहीम….अंतर्गत “स्वच्छ शाळा स्पर्धा” गटामध्ये ‘बार्शी शहरस्तरीय’ स्पर्धंत : अभिनव माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,बार्शी प्रशालेने उत्तम कार्य करून आपले कौशल्य दाखवले;म्हणून बार्शी नगरपरिषदेने पुरस्कार:स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

barshi-nagar-parishad

या प्रसंगी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे-पाटील, श्री.डॉ.बी.वाय.यादव यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. या निमित्त यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी व राजीव स्मृती बहुउद्देशीय शिक्षण संस्था,बार्शी चे आदरणीय संस्था अध्यक्ष अरूण (दादा) बारबोले यांनी प्रशाला प्राचार्य व सर्व स्टाफचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here