धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शहरात जिजाऊ जयंती चे औचित्य साधून धरणगाव एरंडोल जळगाव या चौफुली ला राजमाता जिजाऊ चौक असे नाव देण्यात आले धरणगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने नगरपालिकेचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याकडे असे नाव देण्यासंदर्भात निवेदन दिले होते निलेश चौधरी यांनी नगरपालिकेत ठराव करून सकल मराठा समाज यांची मागणी मान्य केली व नामकरण करण्यात आले.
याप्रसंगी फलकाचे अनावरण नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस सचिव डी जी पाटील जिजाऊ मातेचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष पी एम पाटील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी सिनेट सदस्य दिलीप पाटील भाजपा तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील उद्योगपती जीवन बयस उपनगराध्यक्ष कल्पना महाजन उपसभापती शारदा पाटील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील काँग्रेस तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे चर्मकार संघटनेचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे भाजपा शहराध्यक्ष दिलीप महाजन राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश चौधरी प्रेमराज पाटील शिरीष बयास वसंतराव भोलाने मोहन पाटील सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंदन पाटील गुलाब मराठे गोपाल पाटील भिमराज पाटील मंगेश पाटील समाधान पाटील सुहास पाटील लक्ष्मण पाटील ललित पाटील जगदीश जगताप राहुल मराठे नामदेव मराठे जितू महाराज व सर्व सकल मराठा समाजाचे समाज बांधव व सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.







