कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – शिवाजी पेठेतील प्रसाद हॉल मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेबांची जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस परिवर्तन चे अमोल कुरणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राध्यापिका सुमन कांबळे यांनी बोलताना म्हटले की राजमाता जिजाऊ माॅंसाहेबांच्या प्रेरणेमुळेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ माॅंसाहेब याच खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याच्या संस्थापिका आहेत.
यावेळी प्रभाकर कांबळे, मनीषा घुणकीकर, सुवर्णा कुरणे, अंजना धनवडे, वंदना कुरणे, अर्चना कांबळे, भारती कुरणे दिपाली तडवले, सुजाता बनसोडे, कांचन कांबळे, साक्षी कांबळे, स्नेहल साठे,जनाबाई कांबळे, सुरज कांबळे, सौरभ कांबळे,राज कुरणे,जमुना कुरणे आदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविक व स्वागत परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले तर आभार क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवी यांनी मानले.







