देवळा (नाशिक) (प्रतिनिधी) – वाढीव विज बिलांची केली होळी एप्रिल ते जुन महिन्यात कोरोना महामारीच्या बंदोबस्तासाठी
महाराष्ट्रात सर्वत्र लॉकडाउन जारी करण्यात आला होता ,त्या काळात सर्वच व्यवहार बंद होते जनतेला कुठलाही रोजगार उपलब्ध नव्हता, अशा कठीन परीस्थितीमध्ये महावितरण कंपनीने सर्वच घरगुती ग्राहकांना १५ ते २० टक्के वाढीव विज बिलांची आकारणी करण्यात आली आहे ,वास्तविक पाहता सदर काळात सर्वच व्यवहार बंद होते.
महावितरण कंपनीने अंदाजे तीनही महिन्याचे अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे ,तरी शासनाने महावितरण कंपनीने आकारलेले बिज बिलं माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले व १५ ते २०% वाढीव विज बिल कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव ,ग्रामिण जिल्हाअध्यक्ष राजू शिरसाठ ,प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका अध्यक्ष मधुकर पाचपिंडे , युवा अध्यक्ष महेंद्र बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वाढीव विज बिलांची होळी ही करण्यात आली.
Home Uncategorized लॉकडाऊन काळातील घरगुती वापराचे विजबिल माफ व्हावे यासाठी देवळा तहसीलदाराना स्वाभिमानी शेतकरी...







