चोपडा (रविंद्र पाटील) – चोपडा तालुक्यातील प्रथमच ग्रामीण क्षेत्रातून गणपूर गावात विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले .
सार्वजनिक अंतर ठेवून तहसीलदार अनिल गावीत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .ग्राम. पं. ने लोक सहभागातून जि. परिषदेच्या शाळेत कक्ष सरू केला .
तालुक्यातील डाँक्टरांच्या बैठकीत सगळ्यात जास्तभर देण्यात आला तो विलगीकरण करणे बाबत तालुक्यात जे कोरोना बाधीत रूग्ण सापडले त्यांच्या कुटूंबीतील दोन पासून आठ ते दहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
याबाबत डाँ. दिपक पाटील यांच्यासह सर्व डाँक्टरांनी सांगितले की, कुटूंबातील रूग्ण जरी घरात वेगळ्या रूम मध्ये राहत असेल तरी बाथरूम एकत्रित वापरले जातात व तेथे देखील संसर्ग होवू शकतो त्यामुळे कुटूंबातील जास्तीत जास्त लोक कोरोना पाँझिटिव्ह येत आहेत .
त्यासाठी ज्या दिवशी रूग्णाला ताप आला . त्या दिवशी तो ताप कोरोनाचा आहे .असे ग्रुहीत धरून त्या रूग्णाचे विलिगीकरण केले तर कुटूंबातील इतर लोक कोरोना बाधित होणार नाहीत . म्हणून प्रत्येक गावात अशा रूग्णांचे विलिगीकरण व्हावे . या विचाराने गणपूर गावातील सरपंच , डाँक्टर्स , ग्रामसचिव , तरूणांसह सारे एकत्र येवून गावात 12 रूग्णांसाठी विलगीकरण कक्षासह , तापाचे रूग्ण तपासणी साठी स्वतंत्र ताप तपासणी कक्ष , सुरू केले आहे. यासाठी गावातील डाँक्टर्स व कर्मचार्यासह डाँ. अजय करंदीकर , सेवा देणार आहेत प्राथमिक अवस्थेतील रूग्ण विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहेत.







