नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांना मिळणार; सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

amit-deshmukh

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके याना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here