मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळ विद्याश्रम भिवंडी जिल्हा ठाणे या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विजय जाधव यांना संत रोहिदास समाज प्रबोधन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थेचे प्रमुख कार्यवाह अॅड. दिलिप वाळंज यांनी विद्याश्रम भिवंडी येथे राष्ट्रसंत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम , ब.स.पा. प्रमुख मा.कांशीराम, माजी राष्ट्रपती मा. के.आर. नारायणन, भारतीय समाजोन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्रीअण्णा साहेब जाधव, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा सविनय भेट दिल्या.या प्रसंगी आदरणीय जे.डी.भोईर , जी.आर. पाटील , पिंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.







