‘मेरे ब्रदर की दुल्हन’ फेम अभिनेता अली जाफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

aali-jafar

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ फेम अभिनेता अली जाफरवर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानी मेकअप आर्टीस्टने लीना घानीने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे अली जाफर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लीनाने ट्विरच्या माध्यमातून अलीवर सेक्शुअल हॅरासमेंटचे आरोप केले आहेत. शिवाय त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ट्विट करत लीना म्हणाली, ‘गेल्या अनेक वर्षांपासून मी वैयक्तिक आणि न्यायालयीन वादांचा सामना करत आहे. त्यामुळे मी आता स्वतःसाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान देखील माझं घर आहे. जर आपण देशातील लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठवत असू तर आपल्यावर अत्याचार होणं, प्रतिमा मलीन करणं.. योग्य आहे का?’ असा प्रश्न तिने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

लीनाने सिंध उच्च न्यायालयात खटला दाखल करत अलीविरोधात ५०० मिलिअनची नुकसान भरपाई मागितली आहे. याआधी पाकिस्तानी गायिका, अभिनेत्री मीशा शफीने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here