खिर्डी खुर्द येथे ग्राम पंचायत निवडणुकीत ७८.३६% मतदान

khirdi-election-center
  • २८७० पैकी २२४९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

खिर्डी (प्रतिनिधी) – खिर्डी खुर्द येथे ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण चार प्रभागात २८७०पैकी २२४९ मतदान झाले.ग्राम पंचायत निवडणुकीत सकाळपासूनच मतदातांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून येत होती.यंदा खिर्डी कारांनी गावाच्या निवडणुकीला चांगला प्रतिसाद दिला.

प्रभाग क्रमांक १ मध्ये ७३२ पैकी ५२० इतके मतदान,प्रभाग क्रमांक २ मध्ये ८१७ पैकी ७०९ मतदान,प्रभाग क्रमांक ३ मध्ये ६४३ पैकी ५०८ इतके मतदान,तसेच प्रभाग क्रमांक ४ मध्ये ६७८ पैकी ५१२ मतदान झाले असून एकूण चार प्रभागात २८७० पैकी २२४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदाना ठिकाणी निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवालदार अन्वर तडवी यांनी चोक बंदोबस्त ठेवला या वेळी पोलीस पाटील प्रदीप पाटील,तलाठी एफ.एस.खान,ग्राम सेवक गोपाळ सोनवणे,आशा वर्कर ,आरोग्य कर्मचारी,ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here