कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायत निवडणुकीचे 74% मतदान झाले

bhusawal-election

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील एकूण 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात उतरले होते.

ग्रामपंचायतीचे एकूण 6700 मतदानापैकी 4959 (74%)मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान केंद्रावर सुरवातीला गेट वर सॅनिटीझर व तापमान मोजून सर्व मतदारांना आत सोडण्यात आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मदत केली.bhusawal

मतदान केंद्रावर कुठलीही विपरीत घटना किंवा वाद होऊ नये म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे स पो नि चव्हाण मॅडम , पो हे कॉ युनूस शेख, पो हे कॉ राजू पवार,सोबत होमगार्ड आदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कडेकोट बंदोबस्त लावून तैनात होते.

ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडली यासाठी गावातील पोलीस पाटील व नागरिकांनी खूप मदत केली.

voting-at-bhusawal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here