खुलताबाद तालूक्यात शांततेत मतदान ; २५ ग्रामपंचायतीत ८४. ३२ टक्के मतदान

khultabad-election

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालूक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार रोजी किरकोळ वादावादीचा अपवाद वगळता शांततेत मतदान झाले.२५ ग्रामपंचायती मधील एकूण ८१ प्रभागांमधील ४७४ जागांसाठी ८४.३२ टक्के मतदान झाले असून ४७४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटय़ात बंद झाले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले आहे.

खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शुक्रवार सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती तर, दुपारी मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. khultabad-voter
सायंकाळी मतदानासाठी पुन्हा रांगा लागल्या होत्या.तालुक्यात काही ठिकाणचे किरकोळ प्रकार वगळता एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, आता तालुक्याच्या जनतेचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

ग्रामपंचायत निहाय मतदानाची टक्केवारी
कसाबखेडा ८३ टक्के गल्लेबोरगाव ८७.५३ टक्के बाजारसावंगी ७६.६२ वेरूळ ७९.४८ टक्के राजेराय टाकळी ८३.३१ पळसवाडी ८०.७३ वडोद बुद्रुक ८४.५६ मावसाळा ८८.२५ कागजीपूरा ८५.४७ बोडखा ८६.७० पिंपरी ८९.१६ सराई ८८.१५ भडजी ८४.८७ खांडिपिंपळगाव ८६.७५ सुलतानपूर ८७.४६ धामणगाव ८९.५५ निरगुडी ८०.७८ म्हैसमाळ ८९.२१ गदाना ८५.८२ सोनखेडा ८४.३८ कनकशिळ ८४.११ ताजनापूर ९०.४४ खिर्डी ८३.७३ गोळेगाव ८३.७० झरी ९३.६५ टक्के मतदान झाले आहेkhultabad-voting

खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायती मधील मतदारांची संख्या ५१२४२ असुन पुरूष त्यामधे २४३३७ पुरूष मतदारांची संख्या असून २६८२५ हि महिला मतदारांची संख्या आहे या पैकी २३१५० पुरूषांनी तर २००५९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे एकूण ४३२०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये २५ ग्रामपंचायती मध्ये पुरूषांचे ८६.४२ तर महिलांचे ८२.४२ टक्के मतदान झाले असून एकूण ८४.३२ टक्के मतदान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here