सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – बार्शी शहरातील मुस्लिम कबरस्तान मधील वाढलेले अनावश्यक गवत, काटेरीझुडपे,व स्वच्छतेसाठी #उडानफाउंडेशन व बार्शी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने काम चालु आहे आज या कामाचा 12 वा दिवस व रविवार सुट्टीचा दिवस म्हणून बार्शी शहरातील सामाजिक संघटना व हरित बार्शीचा वसा घेतले वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फाऊंडेशनच्या वतीने आज मुस्लिम कबरस्तान या ठिकाणी श्रमदान करण्यात आले
संघटनेच्या 40 ते 50 सदस्यांनी या श्रमदानात उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा व बार्शीतील सामाजिक एकोपा,सार्वजनिक स्वछता व सर्वसमावेशक एकजूट ही शहराच्या वैभवात किती महत्वाची आहे याचा आदर्श उदाहरण दाखवून दिला तसेच वृक्ष संवर्धन समितीच्या कार्यातील एका सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त कबरस्तान या ठिकाणी वृक्षरोपन ही करण्यात आले.

बार्शी नगर पालिकेच्या वतीने स्वच्छता निरीक्षण म्हणून शब्बीर भाई वस्ताद यांनी शासनाच्या वसुंधरा योजने अंतर्गत स्वछता व देशहित कार्याची शपथ देत स्वच्छतेला सुरवात करण्यात आली.व नगरपालिकेच्या वतीने सर्वाना कॅप(टोपी)वाटप करण्यात आली.व उडाण फाउंडेशन च्या वतीने वृक्ष संवर्धन समिती व जाणीव फाउंडेशन चे सर्व सदस्य याचा सत्कार करून आभार मानण्यात आले.







