भादली गावात एक नवा अध्याय सुरू : ग्रा.पं.निवडणुकीत तृतीयपंथी अंजली पाटील विजयी

anjali-bhadali

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील तालुक्यातील भादली वार्ड क्रमांक 4 मधून तृतीयपंथी अंजली पाटील विजयी यांचा विजय झाला आहे. या विजयाने भांदली गावात एक नवा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एका तृतीयपंथी उमेदवाराला स्त्री राखीव या वर्गवारीतून निवडणूक अर्ज बाद करण्यात आला होता या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला आव्हान देत निवडणूक लढविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे.

आज निकाल हाती येताच भादली बुद्रुक वार्ड क्रमांक 4 मधून अंजली पाटील विजयी झाल्याने मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला. विजयानंतर जळगांव येथील ख्याजा मिया दर्गा येथून जाऊन चादर चढवली. अंजली पाटील यांच्या विजयाने एक नवा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here