ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण अधिक फायदेशीर ठरेल.

    manoj-bachale-vardha

    वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज भाऊराव बाचले)
    मी रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे सन 2005 पासून कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.23 मार्च 2020 पासून संपूर्ण जगाला covid-19 या रोगाने वेटीस धरलेले आहे. या महामारी मुळे जगाला मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. त्यामुळे सर्वजण भेदरलेल्या परिस्थितीत दिसून येते.

    जिकडे तिकडे रोजगार बंद झालेले आहे. एकमेकांशी संपर्क तुटला आहे. माणूस एकमेकापासून दूर झालेला आहे. खबरदारी घेण्यासाठी शासनाने नियोजन केले. जिकडेतिकडे शाळा महाविद्यालय ओसडुन पडलेली आहे. शिक्षक व विद्यार्थी हे दोघांन पासून दुर झालेले आहे. फळा खडू विना सोडून पडलेला आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. म्हणून शासनाकडून ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु त्याची अंमलबजावणी मध्ये बऱ्याच अडचणी आल्या 26 जून 2020 पासून मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर जिल्हा -. येथील संपूर्ण शिक्षक व मुख्याध्यापक फोनवरून संपर्कात येऊ लागला. त्यासाठी उपाय शोधले. प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअप च्या माध्यमातून ग्रुप करून विद्यार्थ्यांना जोडण्यात आले.
    प्रत्येक शिक्षक पालकांशी संवाद साधून संपर्क करू लागला. आम्ही ग्रामीण भागात गरीब वर्ग असल्याने प्रत्येक जण मोबाईल घेऊ शकत नाही. मोबाईल घेऊ शकले नाही. जे पालक मोबाईल घेऊ शकले. त्यांना एक दिवस अगोदर प्रत्येक विषय मिटिंग दारा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडण्यात आले. ज्यांच्याजवळ काही साधन नाही. त्यांच्याकडे गावोगावी जाऊन ऑफलाइन शिक्षण देण्यात आले. ऑनलाइन शिक्षणामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा इत्यादी घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष मुलांना भेटण्याचा आनंद मिळाला. ऑनलाइन मुळे प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले व त्याचे समस्याचे निराकरण करण्यात आले.

    मोबाईल त्या वेळेस पालक कामावर घेऊन जातात विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित राहू शकत नाही. त्यांच्या सोयीनुसार शिक्षण देण्यात आले.विद्यार्थ्यांना छोटे-छोटे उपक्रम देऊन त्याचबरोबर स्वाध्याय देखील दिला जातो. विद्यार्थ्यांना आनंदाने ते पूर्ण करतात अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण चालू ठेवून प्रयत्नशील आहे. स्वामी विवेकानंद विवेकानंद यांनी सांगितले की उठो जागो और तब तक नही रुको जब तक आपको अपना लक्ष्य ना प्राप्त हो. म्हणजे एखाद्याने त्याच्या जीवनात त्याचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते. एवढेच नाही तरी विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेले अध्यात्मिक विचार सुद्धा लोकांना प्रेरित केले नियंत्रण करताना मोठी संकटे आली. तरी आम्ही मागे सरकणार नाही. आम्ही विद्यार्थी घडविण्याचे करण्याचे कार्य करत राहणार या भूमिकेत शिक्षक ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here