खुलताबाद (प्रतिनिधी सतीश कोळी) – आज दिनांक १८ जानेवारी रोजी दरवर्षी प्रमाणे शिक्षक समितीच्या दिनदर्शिके विमोचन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना शिक्षक समितीच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची प्रशंसा केली.
शिक्षक समितीच्या माध्यमातून कोरोना लसीकरण संदर्भात शाळेच्या गावातील नागरिकात जनजागृती करण्याचे आवाहन। केले. कोरोना काळात शिक्षक समितीच्या वतीने व्हाँटस्अपवरराबविण्यात आलेल्या आँनलाईन विविध प्रकारचे प्रशिक्षण तसेच आँनलाईन अभ्यासक्रम ची यावेळी त्यांनी प्रशंसा केली.
दिनदर्शिका विमोचनवेळीजि.प.अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक रविंद्र देवडे,जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, कार्याध्यक्ष के.के.जंगले, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,औरंगाबाद तालुकाध्यक्ष कडूबा साळवे,फुलंब्री तालुकाध्यक्ष कैलास ढेपले,औ.तालुका सरचिटणीस बबन चव्हाण,फुलंब्री ता.सरचिटणीस रंविंद्र नगरे,औ.तालुका कोषाध्यक्ष विलास चव्हाण,उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद गौस,सलीम शेख,पाशू शहा,तालुका नेते विजय पवार,खु.बाद तालुका नेते संजय शेळके, फुलंब्री तालुका नेते यशवंत आहेरकर पद्माकर हिलजूते,जिंतेद्र भामरे,भिमराज चौधरी आदी उपस्थित होते.







