सांगली येथे संपन्न होणाऱ्या नाट्य संमेलन विषेशांकसाठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन

natya-samelan-visheshank

मुंबई (विशेष प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) – सालाबादप्रमाणे या वर्षीही साक्षीदार प्रकाशनतर्फे नाट्य संमेलन विषेशांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा सांगली येथे संपन्न होणाऱ्या नाट्य संमेलन विषेशांक साठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

साहित्य साक्षीदार प्रकाशन गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम राबवित असून, यंदाच्या विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, खरं पाहता हा नाट्य संमेलन विषेशांक मार्च,२०२० मध्ये वाचकांच्या पसंतीस येणार होता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊन मुळे मार्च २०२१ लाच सांगली येथे प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न होणाऱ्या नाट्य संमेलनात या विषेशांकाचे प्रकाशन होणार आहे.

तेव्हा वाचकांना आम्ही आवाहन करत आहोत की नाट्यपंढरी सांगली विषयक लेख, आजमितीस झालेल्या संमेलन विषयी काही गमती जमती, किस्से, गाजलेली संमेलने अशाप्रकारच्या माहितीपूर्ण लेखाना या अंकात स्थान दिले जाणार आहे. तेव्हा कवी, लेखक यांना आम्ही आवाहन करतो कि त्यांनी आपले साहित्य साक्षीदार प्रकाशन ., सत्यवान तेटांबे – ९८६९५०१३६८ यां नंबरवर तसेच, डी-३०३, क्रेमलिन, जयराज नगर, बोरिवली (पूर्व) , मुंबई – ४०० ०९१.या पत्त्यावर आणि http://[email protected] आणि http://[email protected] वर पाठवावे, असे आवाहनही या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here