लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायत जिंकून ‘आप’ची महाराष्ट्रात एन्ट्री केजरीवालांनी केलं मराठीत ट्विट

arvind-kejariwal

नवी दिल्ली – नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात शिवसेनेला सर्वाधिक ग्रामपंचायतीत यश मिळाल्याचे दिसत असताना राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाने देखील महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणूक जिंकून आपने शानदार विजय मिळवला आहे.

लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. आपचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटला उत्तर देत आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी मराठीत ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात 7 पैकी 5 जागांवर आपच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन, असं ट्विट अजिंक्य शिंदे यांनी ट्विट केलं होतं. अजिंक्य शिंदे यांच्या ट्विटला केजरीवाल यांनी मराठीत उत्तर दिले. ‘विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा’, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here