शिरसोलीच्या उमेदवारांची फेरमतमोजणी करण्याची जिल्हाधिकार्‍याकडे मागणी

फेरमतमोजणी

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्हयात एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.

या मतदानोत्तर मतमोजणीदरम्यान केवळ दोन मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील प्रभाग क्र.६ मधील हर्षदा अस्वार आणि वर्षा बारी या दोन उमेदवारांनी सोमवार १८ रोजी झालेल्या मतमोजणीवर आक्षेप असून याची फेरमतमोजणी करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांना देण्यात आले आहेत.

या संदर्भात तक्रारदार उमेदवारांनी निकाल जाहिर झाल्यानंतर तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात अर्ज करण्यासंदर्भात सांगण्यात आले असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here