अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप

shrlyan-chopra-with-sajeed-khan

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद खान यांच्यावर आणखी एक आरोप झाला आहे. हा आरोप बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केला आहे. साजिदने ६ वर्षापूर्वी भेटीदरम्यान केलेल्या कृत्याचे कथन शर्लिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यात तिने साजिदने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

शर्लिन चोप्राने एक ट्विट केले आहे. यात तिने म्हणलं आहे की, माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी मी एप्रिल २०१५ मध्ये साजिदची भेट घेतली. या भेटीदरम्यान साजिदने तिच्याशी गैरकृत्य केले, असे शर्लिनचे म्हणणे आहे.

दरम्यान, याआधी बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिची बहिण करिश्मा हिने देखील साजिद खान यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. रिहर्सलदरम्यान जिया स्क्रिप्ट वाचत होती. तेव्हा साजिदने तिला टॉप काढण्यास सांगितले असल्याचा आरोप तिने केला होता. त्यावेळी तिला काय करावे हे समजले नाही. तेव्हा तिने सांगितले की, अजून चित्रपटाची शुटिंग सुरू झालेली नाही आणि हे सर्व काय सुरू आहे. यानंतर ती घरी येऊन रडू लागली. २०१८ मध्ये जेव्हा मी टू कॅम्पेनला सुरूवात झाली. यात साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here