खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना क्रांती चौक येथे घडली. विष पिताना तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरू केले होते. पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी वेळीच तरुणाला रोखले. तरुणाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.







