मनियार बिरादरीचे फारुक शेख यांची तक्रार
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – दिनांक 13 जून रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना जळगाव शहरातील चार नामवंत खाजगी डॉक्टरांनी औषधोपचार न केल्याने अकसानगर मधील तीन रुग्ण मयत झाली तर दोन रुग्णांना मानसिक शारीरिक व आर्थिक ताण सहन करून शासकीय महाविद्यालयात ऍडमिट केले याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याशी भेटून मन्यार बिरादरी ने सविस्तर तक्रार दाखल केली होती व त्यावर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एस एन चव्हाण यांना सदर तक्रारी बाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
१३ जून ते ९ जुलै पर्यंत खाजगी दवाखाने अथवा डॉक्टरांवर काही कारवाई न झाल्याचे दिसून आल्याने मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चव्हाण यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी अशी तक्रार प्राप्त झाली नाही असे म्हणून फारुक शेख यांना रवाना केले होते.
त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय याठिकाणी फारुक शेख यांनी प्रत्यक्ष तपासणी व पाहणी करून स्थानिक वर्तमानपत्रात या गोष्टीला वाचा फोडली असता त्यावर सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी वार्ताहरांना सुद्धा खोटी माहिती दिली की अशी तक्रार आज पर्यंत प्राप्त नाही.
दिनांक ११ जुलै २० रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चव्हाण यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका जळगाव यांना पत्र क्रमांक ३३५७ ते ३३६१ हे सादर करून जिल्ह्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे व त्यात काही खाजगी डॉक्टर रुग्णांवर औषधोपचार करीत नाही तरी मन्यार बिरादरी च्या तक्रार पत्रा मधील संबंधित डॉक्टरांची चौकशी करून दोन दिवसात जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करावा असे पत्र दिले व त्याची प्रत संचालक, उपसंचालक आरोग्य सेवा तसेच जिल्हाधिकारी जळगाव व तक्रारदार फारुक शेख अध्यक्ष मन्यार बिरादरी यांनासुद्धा दिली.
फारुक शेख यांनी १३ जुलै रोजी माननीय राजेश जी टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सहा पानी तक्रार देऊन डॉक्टर एस एन चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक यांची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे यात त्यांनी
१)जिल्हा दंडाधिकारी व आपत्ती व्यवस्थापक यांचे दि १४ जून रोजी चौकशीचे आदेश असतानासुद्धा डॉक्टर चव्हाण यांनी चौकशी का नाही केली?
२) जिल्हाधिकारी यांच्या चौकशी आदेश पत्रावर डॉ चौहान यांनी फक्त सर्वांना सूचना द्या असे का व कोणाला म्हटले?
३) तक्रारदार शेख यांनी तक्रारीची स्थळ पत्र दाखवून सुद्धा खोटे का बोलले की अद्याप असे पत्र आम्हास आलेले नाही?
४) वार्ताहरांनी सुद्धा विचारले असता त्यांना सुद्धा त्यांनी असे पत्र मिळालेले नाही अशी खोटी माहिती का दिली?
५) सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हाअधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी असून त्यात या कोविड १९ मध्ये त्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून दिले आहे व त्यांचे आदेशाचे पालन करणे हे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कर्तव्य असतानासुद्धा त्यांनी परस्पर मुख्य वैद्यकीय अधिकारी मनपा यांना त्या खाजगी डॉक्टरांची चौकशीचे आदेश कशाच्या आधारे दिले ?
६)एवढेच नव्हे तर स्वतः २५ ते २७ दिवस चौकशी आदेशाचे पत्र आपल्याकडे दाबून ठेवले व मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन दिवसात चौकशी करण्याचे आदेश परस्पर कोणत्या आधारे देत आहे?
या सर्व बाबींचा उलगडा होणे आवश्यक असून तसेच जी तक्रार १३ जून रोजी दिलेली आहे त्याची सविस्तर चौकशी होऊन संबंधित डॉक्टरांवर , दवाखान्यावर व त्यांना सहकार्य करणारे इतर अधिकारी वर्गांवर भारतीय दंड विधान कायदा ३०४ (अ),१२० (ब) ३४ व कोविड १९ च्या कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी फारूक शेख यांनी केलेली आहे.







