ईटीगा कार सह गांजा वाहतुक करतांना नवी मुंबईतील दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धुळे (प्रतिनिधी) – शुक्रवारी (दि.१०) गोपनीय माहिती मिळाली कि, शिरपुर कडुन मालेगाव कडे एक पांढ-या रंगाच्या ईटींगा कार क्र.एम.एच ४३ बी पी ०९७२ ही जात असुन तिच्या मध्ये गांजा आहे. सदर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा धुळे पथकाने धुळे शहरातील ४० गांव चौफुली येथे अडथळे लावुन सापळा लावला असता ११/०५ वाजता वरील क्रमांकाची इटींगा कार ही येत असताना तिस अडथळे लावुन थांबवून त्यातील दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांचे नावे १) विनोद मनोहर धोत्रे वय ३३ वर्ष व (२) आकाश वसंत कांवळे वय २२ दोन्ही राहणार आण्णाभाऊ साठे नगर दिघा ऐरोली नवी मुंबई असे सांगितले. त्यांनतर सदर गाडीची झडती घेता गाडीचे मागील सीटवर खालील वर्णनाचा गांजा मिळुन आला.
८५४४०/- रुपये किमतीची सात पुडके खाकी प्लास्टीकच्या रॅपरने गुडाळलेले त्यात गांजा सदृश्य हिरवट, पिवळसर रंगाचा अर्धवट सुकलेला पाने,विया,काडया,असलेला उग्र वासाचा गांजा सदृश्य पदार्थ असा १४ किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा. सदर गांजा, इटींगा कार, दोन मोबाईल असा एकुण ७,८६,९४० रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या इसमांना विचारपुस करता त्याना सदर गांजा हा शिरपुर येथील सोनु नावाच्या इसमाने दिल्याचे सांगुन तो ऐरोली, नवी मुंबई येथील संतोष धोंडीबा गायकवाड यास देणार असल्याचे सांगितले.
सदरची कारवाई ही श्री.चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक धुळे, डॉ.श्री.राजु भुजबळ अपर पोलीस अधीक्षक, धुळे व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवत याचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि/ उमेश बोरसे, पोसई/अनिल पाटील, पोसई/ हनुमंत उगले, असई नथ्थु भामरे, पोहेकॉ/१२४३ महेंद्र कापुरे, पोना/ ६४९ कुणाल पानपाटील, पोकॉ/ १२८८ उमेश पवार, पोकॉ/ १३८४ रविकिरण राठोड, पोकॉ/८५० विशाल भालचंद्र पाटील, पोकॉ/१६७२ सागर सुभाष शिकं, पोकॉ/ प्रंशात माळे, चालक पोकॉ/७८३ गुलाबराव पाटील असे स्थानिक गुन्हे शाखा,धुळे यांनी नायब तहसिलदार श्री बी बी पावरा यांचे उपस्थितीत यशस्वी केलेली असुन चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here