शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी, कृषीशास्त्र विभागांतर्गत आणि कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांचा माध्यमातून २२ते२८ जानेवारी दरम्यान दहाव्या जागतिक कृषी महोत्सव सप्ताहाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रासह व पर राज्य व पर देशात देखील करण्यात आले आहे या वर्षी कोरोनाच्या संकाटामुळे सर्व प्रकारचे नियम पाळून शेतकऱ्यांच्या बांधावरच छोटे खानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली.
दरवर्षी नाशिक येथे केल्या जाणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवामध्ये लाखो शेतकऱ्यांची उपस्थिती व सहभाग असल्याने यांदाच्या महोत्सवामध्ये गदा जंगल गर्दी टाळण्यासाठी पर देशासह, परराज्य आणि महाराष्ट्रात सुमारे १,१०० ठिकाणी या कृषी महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिकाणी होणार कृषी महोत्सव
परदेशात- जपान, फिनलँड, कॅनडा, नेपाळ, या ठिकाणी व वर राज्यात÷मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, गुडगाव, हरियाणा, कर्नाटक व गोवा महाराष्ट्रात तालुका-जिल्हानिहाच विविध ठिकाणी गावपातळीवर कमी-अधिक संस्थेने सुमारे ९००पेक्षाही अधिक महोत्सव होणार आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या कृषी महोत्सवात नंदुरबार जिल्हा व शहादा तालुक्याचा समावेश केला गेलेला आहे. आणि २५जानेवारी रोजी शहादा तालुक्यातील वाघोदा येथे कृषी महोत्सवाचे आयोजन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात येणार आहे व २७जानेवारी ला धडगाव तालुक्यात या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. म्हणून कृषी मेळावा संदर्भात दिनांक १७ जानेवारी रोजी धडगाव तालुक्यातील माजी नगराध्यक्ष अहिल्याबाई इंद्रसिंग पावरा, नगराध्यक्षा सुरेखा लतेश मोरे, पोलीस पाटील.लोटनदादा पावरा, समाजसेवक लतेश सुभाष मोरे,माजी सरपंच राजेद्र पावरा, जिल्हापरिषद सदस्य गणेश परारके, अजबसिंग गिरासे व इतर मान्यवर सेवेकरींनी मार्गदर्शन केले.







