आटपाडी (प्रतिनिधी) – १७ जानेवारी रोजी आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे पार पडलेल्या २८ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवामध्ये अनेक वर्षाच्या साहित्य सेवे बद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांचा स्मृतिचिन्ह आणि श्री . संत तुकाराम महाराजांची गाथा देवून सन्मान करणेत आला .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री . श्रीपाल सबनीस सर ( पिंपरी चिंचवड ) आणि उर्वरीत वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री . उल्हासदादा पवार ( पुणे ) यांनी आपल्या भाषणात सादिक खाटीक यांच्या आजवरच्या साहित्यीक क्षेत्रातल्या वाटचालीचा उत्स्फुर्त उल्लेख करून गौरवोदगार काढले.
यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्री . श्रीनिवास पाटील साहेब, डॉ. डी . वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.डी .पाटील, मराठी भाषेचे आधूनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगुळकर, प्रा मिलींद जोशी, उद्धव कानडे ,सौ.प्राजक्ता माडगूळकर कु.पलोमा माडगूळकर , लावणी सम्राज्ञी वैशाली काळे नगरकर, पुरुषोत्तम सदाफुले, सुदाम भोरे, मुरलीधर साठे, राजेंद्र वाघ , सुरेश कंक, प्रा दिगंबर ढोकले इत्पादी मान्यवर उपस्थित होते.







