खवय्यांसाठी नवं चॅलेंज : थाळी संपवा आणि बुलेट जिंका

bullet-thali-at-hotel-shivraj
  • पुण्याच्या हॉटेलचालकाची अनोखी शक्कल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ‘तासाभरात 4 किलोची बुलेट थाळी संपवा…अन् नवीकोरी बुलेट घरी घेऊन जा’ अशी भन्नाट ऑफर पुण्याच्या एका हॉटेलमालकाने जाहीर केली आहे. लॉकडाऊननंतर हॉटेल व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी या हॉटेल मालकाने ही अनोखी शक्कल लढवली आहे. खवय्यांचा देखील या ऑफरला चांगला प्रतिसाद मिळतोय.

पुण्यातील वडगाव मावळ या भागातील शिवराज हॉटेलने खवय्यांसाठी ही भन्नाट ऑफर दिली आहे. या हॉटेलाच्या दारात ऐटीत उभ्या असलेल्या प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या पाच रॉयल एनफिल्ड सध्या खवय्यांचे लक्ष वेधून घेतायत.bullet-thali-with-bullet

 

या अनोख्या स्पर्धेबाबत शिवराज हॉटेलचे मालक अतुल वायकर सांगतात, अनलॉकमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू झाला तरी अजूनही ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. फायदा तर सोडाच हॉटेलच्या देखभालीचा खर्च आणि स्टाफचा पगार काढणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही भन्नाट ऑफर आम्ही आणली आहे. या स्पर्धेमुळे आता हॉटेलात पुन्हा पूर्वीसारखी गर्दी वाढू लागली आहे. सध्या दिवसाला 25 ते 30 थाळींची विक्री होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here