प्रभाग ९३-९५ मधील अंर्तगत भागातही रंगरंगोटी करून आगरी – कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करा : विरेंद्र म्हात्रे

virendra-mhatre-navi-mumbai

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव परिसरातील अंर्तगत भागातही गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून  त्यावर आगरी व कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र प्रकाशित करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसकमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

navi-mumbai-congress-nivedan

महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून नवी मुंबई शहरात सुशोभीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याअंर्तगत भिंतींची, पदपथाच्या खालील सिमेंटच्या ठोकळ्यांची, बाह्य भागातील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी सुरू आहे. त्यावर सुभाषिते तसेच वेगवेगळी चित्रे रंगविली जात आहेत. प्रभागाचा बकालपणा घालविण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्वप्रथम  महापालिका आयुक्त व  महापालिका प्रशासनाचे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसकमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच  आभार मानले आहेत.

नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव मध्ये अधिकांश भाग हा साडेबारा टक्के व सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या स्वच्छता अभियानातंर्गत आतंर्गत मुख्य रस्त्यावरील गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून आपले कार्य थांबवू नये. तर प्रभागातील अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायट्याच्या संरक्षक भिंती, सार्वजनिक मैदाने, उद्यानांच्या संरक्षक भिंतीची  रंगरंगोटी करून त्यावर आगरी कोळी संस्कृतीचे जतन करणारे चित्र रंगविण्यात यावीत. रंगरंगोटी, सुभाषिते, रंगविली जाणारी छायाचित्रे याचा  दर्जाचा चांगला असावा, सुमार नसावा. अंर्तगत भागातही सुशोभीकरण, रंगरंगोटी व  आगरी-कोळी नागरिकांच्या सुभाषिते रंगविल्यास खऱ्या अर्थाने प्रभागात स्वच्छता अभियान सार्थकी लागल्याचे स्थानिक रहीवाशांना जवळून पहावयास मिळेल. स्वच्छता अभियान राबविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना आपण नेरुळ गांव प्रभाग ९३-९५ मधील सेक्टर २०,२०ए नेरुळ गाव परिसरातील अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या तसेच सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणाच्या संरक्षक भिंतीची  रंगरंगोटी  करून त्यावर सुभाषिते व चित्रे रंगविण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची  मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here