वाहनचालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही

cctv-on-highway-camera

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पुणे द्रुतगती मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी येत्या वर्षभरात २०३ सीसीटीव्ही कॅ मेरे बसवण्यात येणार आहेत. करोनाकाळात या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निविदा प्रक्रिया थांबली होती. त्यास आता गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.

द्रुतगती मार्गावरुन जाताना वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहन चालवणे, अवजड वाहने एका मार्गिके तून दुसऱ्या मार्गिके त जाणे, अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन के ले जाते. त्यामुळे अपघातही मोठय़ा प्रमाणात होतात. याला आळा बसावा म्हणून वाहतूक पोलीस उपलब्ध मनुष्यबळाबरोबरच स्पीडगन, ब्रेथ अ‍ॅनलायझर, ई-चलान यंत्रणा अशा सुविधा असलेल्या अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल‘मार्फतही कारवाई करतात. त्यामुळे एमएसआरडीसीने ‘महामार्ग वाहतूक व्यवस्थापना’अंतर्गत २०३ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय साधारण सव्वावर्षांपूर्वी घेतला होता. या निविदा प्रक्रियेला आता गती दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here