तिरुवनंतपुरम (केरळ) – येथील निर्भया केंद्रात सुरु असेलल्या काऊन्सिलींगदरम्यान एका 17 वर्षांच्या पीडित मुलीने आपला अनुभव सांगितल्यानंतर तुमच्या पायाची जमीन सरकेल. दिल्लीमधील निर्भय घटनेने सर्वांनाच जबर धक्का बसला होता. त्यानंतर पुन्हा असाच अत्यंत क्रुर आणि लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक महिन्यात या १७ वर्षीय मुलीवर ४४ जणांनी बलात्कार केला. ही मुलगी गेले अनेक महिना हा त्रास…अत्याचार सहन करीत होती. खळबळजनक बाब म्हणजे यापैकी २४ लोक अद्याप बाहेर मोकाट फिरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीने निर्भया केंद्रावर काऊन्सिलिंगदरम्यान ही बाब व्यक्त केली. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पल्लकडमध्ये एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीच्या आरोपाखाली ४४ पुरुषांविरोधात ३२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी केवळ २० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर उरलेल्या २४ जणांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींपैकी अनेक जण न्यायालयीन अटकेत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसात बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार १०० टक्के शिक्षित लोकसंख्या असलेलं राज्य बलात्काराच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.







