पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस देणार

narendra-modi

नवी दिल्ली – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. आता कोरोना लसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना लस देण्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

कोरोना लसीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आता घाबरण्याची गरज नाही. कोरोनाविरोधात महत्त्वाची लढाई सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. आता दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी आणि सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह ५० वर्षांवरील खासदार, आमदार यांनाही दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सध्या देशभरात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोसही त्यांना दिल्यानंतर हा टप्पा संपेल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here