शिमोगा (कर्नाटक) – येथे गुरुवारी रात्री डायनामाईटचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शिमोगा शहरापासून 5 ते 6 किलोमीटर आत असलेल्या ग्रामीण भागात झाला.
या स्फोटात एका ट्रकचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधी जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा लोकांना भूकंप झाला असावा असं वाटलं, कारण स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांच्या काचाही फुटल्या.
या स्फोटामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. या भीषण स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकार पीडितांची सर्वतोपरी मदत करेल, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.







