नाशिक (प्रतिनिधी) – गतवर्षी शेवटच्या दोन महीन्यात झालेल्या अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले होते,
त्यामुळे लाल कांद्याचे एकरी उत्पादन फारच कमी प्रमाणात आले होते तसेच दिपावली आसपास शेकंऱ्यानी अनेक वेळा उन्नाळ कांद्याचे बियाने टाकले , पंरूतु अतिपावसा मुळे ते उतरले नाही , त्यामुळे लागवडीसाठी उपयुक्त उन्नाळ कांद्याचे रोपं डिसेबर जानेवारी पर्यंत कमी प्रमाणात उपलब्ध झाल्या मुळे ,शेतकंऱ्यानि लेट ,अगदी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत लागवड केली ,परीणामता उशिरा लागवडी मुळें ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रील महीन्याच्या अखेरीस कांदा काढणीस तयार झाला , नेमका त्याच वेळेस कसमादे मध्ये काही प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले ,शेतकंऱ्यानी तोही कांदा चाळीत साठवुन ठेवला आहे ,अशा साठवलेला कांदा खराब होऊ लागला आहे ,तो दिपवाळी पर्यंत टीकण्याची शक्यता वाटत नसल्या मुळे शेतकंऱ्यानि चाळीतील कांदा बाहेर काडायला सुरवात केली असुन ,मोठ्या प्रमाणावर तो चाळीतच सडत असल्या मुळे कांदा उत्तपादकांची झोप उडाली आहे ,सध्या विडेवाडी ,भऊर परीसरात चाळीतील कांदा सडत असुन भऊर येथील प्रगतीशील शेतकरी बाबुराव पांडुरंग पवार यांच्या चाळीतील कांदा सडत असल्या कारणाने तो बाहेर काडुन फेखा वा लागत आहे ,५० % पेक्षा जास्त खराब झाल्या मुळे शेतकंऱ्याना तो बाहेर काडुन माती मोल भावात विकण्या शिवाय पर्याय नाही, तरी शासनाने तरतरीत हस्तक्षेप करून केंद्र सरकारने किमान हमी भावाने सरसकट कांदा खरेदी करून उत्तपादकांना दिलासा द्यावा व किमान 10 लाख टन कांदा निर्यात करावी व त्यासाठी प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात यावे, अशी मागणी कांदा उत्तपादक शेतकरी संघटना नाशिकचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे.







