भारतीय जनता पार्टिच्या वतीने नगरपालिकेस निवेदन

धरणगाव (योगेश पी. पाटील) – शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका भोवती सुरु असलेले काम तात्त्पुरता स्वरूपाचे दिसुन येत आहे,जुन्या बांधकामावरच बांधकाम करत आहेत त्याचबरोबर लोखंडी रेलिंग सुध्दा जुनीच आहे,त्यामुळे भारतीय जनता पार्टिच्या वतीने निवेदन देण्यात आले की बाबासाहेबांच्या स्मारका सभोवताली पूर्ण RCC स्ट्रक्चर बांधकाम करून अद्यावत सुशोभीकरण करावे,लोखंडी रेलिंग चांगल्या दर्जाची बसवावी, ग्रेनाइट मार्बलचा वापर करावा,
स्मारकाच्या परिसरात फ्लेव्हर ब्लॉक बसवावे.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन भारतीय जनता पार्टी करेल असे निवेदन नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.त्यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते शिरीषआप्पा बयस, तालुकाध्यक्ष अँड़.सजंय महाजन,पुनिलालआप्पा महाजन,अँड़.भोलाणे बापु,शहराध्यक्ष सुनील वाणी,दिलीप महाजन,नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे,सुनील चौधरी, कन्हैया रायपुरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here