कोण देणार लक्ष? याकडे सर्वांचे लक्ष लागुन..
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर तालुक्यातील कुसूंबा ते रावेर हा रस्ता गेल्या दोन वर्षापासुन खड्ड्यात गेला असल्याने या रस्त्याला उतरती कळा लागली आहे. सद्यस्थितीत ह्या रस्त्याने प्रवास करीत असतांना वाहनधारकांना, प्रवाशांना, शेतकऱ्यांना, मजुरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
कुसूंबा ते रावेर या रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. हा सगळा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, आमदार, खासदार व संबधित मंत्री यांना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक या कुसुंबा ते रावेर रस्त्यांसह संपुर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चिञ २ वर्षापासून पहावयास मिळत आहे.

संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी आजदेखील या रस्त्यांकडे दुर्लक्ष करुन बघ्याची भुमिका घेत आहेत. रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेचे हाल व भावना दुखावण्याचे काम संबधित विभाग करीत असल्याचे जनतेकडून ऐकवण्यास मिळत आहे. पाल ते इंदौर हा रस्ता हायवे बनल्याने संपुर्ण भारतातुन क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेले मोठमोठे ट्रक हे राजस्थान,दिल्ली, झारखंड, हरियाना, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशकडुन या रस्त्याने ये-जा करीत असतात. यामुळे देखील लहान वाहनधारकांचा,प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.याकडे परिवहन अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे तालुक्यातील जनतेकडुन बोलले जात आहे,
याबाबत संबधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब जागे व्हावे व या कुसुंबा ते रावेर, लोहारा ते कुसूंबा मार्गावरील १ ते २ किलोमीटरचा सुकी नदी पुलापर्यंतचा रस्ता ताबडतोब डांबरीकरण करावा.अशी तालुक्यातील परिसरातील शेतकरी, मजुर,वाहनधारकांकडुन रास्त स्वरुपाची मागणी करण्यात येत आहे..या निवेदनानंतर तरी संबधित रस्त्यांची दखल घेतली जाते किंवा नाही,याकडे माञ तालुक्यांसह जिल्हयाच्या जनतेचे लक्ष लागून आहे.







