बंजारा समाजाच्या स्त्रियांबद्दल लिखाण करणाऱ्या लेखक भालचंद्र नेमाडेंवर कारवाईची मागणी

chalisgaon-banjara-samaj-nivedan

चाळीसगांव (प्रतिनिधी) – लेखक भालचंद्र नेमाडे द्वारा लिखित कादंबरीत लभान- बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लिखाण जाणीवपूर्वक केल्याबद्दल नेमाडे व सबंधित प्रकाशक पाॅप्युलरचे हर्ष भटकळ या दोघांवर शासनातर्फे गुन्हा दाखल करून या गंभीर विषयाच्या अनुषंगाने या कादंबरीच्या विक्रीवर निर्बंध आणून, सदर लेखकाला मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याबाबत ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फांऊडेशनद्वारे तहसिलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

‘हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी नेमाडे यांनी लिहिलेली असून या कादंबरीची पहिली आवृत्ती ही भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबईद्वारा जुलै २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. या कादंबरीस साहित्य क्षेत्रांतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.या कादंबरीत हरिपुरा या लभान अर्थात बंजारा समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले असून या समाजातील स्त्रियांविषयी अत्यंत अश्लील व बिभत्स स्वरूपाचे लेखन करून त्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील जवळपास बारा कोटी बंजारा समाजाच्या भावना दुखविण्याचे कार्य लेखकाने हेतुपुरस्पर केल्याचे कादंबरीतील लिखाणावरून स्पष्ट दिसुन आले. अशा आक्षेपार्ह तथा अवास्तविक लेखनामुळे समाजातील सांस्कृतिक मूल्याला ठेस पोहचल्याने लभाण- बंजारा समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून देशभरातील समाजासाठी ही अत्यंत दुर्दैवी व निंदनिय घटना ठरली आहे.

chalisgaon-banjara

या कादंबरीच्या अथपासून इतिपर्यंत स्त्रीयांच्या माध्यमातून बंजारा समाजाचे चरीत्रहनन लेखकाने केलेले असून कादंबरी प्रकाशित करून सर्वत्र प्रसारित करण्याचे कार्य प्रकाशकांनी केले आहे.’हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ ही त्रिखंडात्मक कादंबरी असल्याचा उल्लेख स्वत: लेखकांनी आजवर अनेकदा केलेला आहे. जर अशा प्रकारचा उल्लेख स्वतः लेखकच करीत असेल तर अपूर्ण कादंबरीच्या पहिल्याच खंडाला ज्ञानपीठ पुरस्कार कसा देण्यात आला? पुरस्कार निवड समितीला या कादंबरीतून विशिष्ट समाजाबद्दल व त्या समाजातील स्त्रियांबद्दल लेखकाने दूषित भावनेतून लिखाण केल्याचे कसे दिसले नाही? या कादंबरीतून समस्त लभान अर्थात बंजारा समाजाच्या स्रियाबद्ल नामुष्कीचे लिखाण करून या स्वाभिमानी समाजाच्या अस्मितेला दुखविण्याचे,अपमानीत करण्याचे आणि चेतवण्याचे जाणीवपूर्वक कार्य लेखकाने केले आहे.
आज लेखक भालचंद्र नेमाडे व प्रकाशक यांच्या विरोधात लभान- बंजारा सामाजाच्या तिव्र भावना लक्षात घेता व समाजाकडून कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडण्यापूर्वी तात्काळ लेखक व कादंबरीच्या प्रकाशकाला अटक करून, या कादंबरीला चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकाराला तथा ज्ञानपीठ पुरस्कार समितीला शिफारस करून तात्काळ कादंबरीच्या विक्रीवर बंदी आणावी या विषयाचे आशय असलेले निवेदन सदर फाऊंडेशन मार्फंत देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अशोक राठोड यांच्यासह कांतीलाल राठोड,योगेश्वर राठोड,अनिल चव्हाण, सुनील राठोड,भीमराव राठोड,गुलाब राठोड,हरीचंद राठोड,रुपसिंग जाधव,राजू चव्हाण,अविनाश राठोड,दिनकर राठोड ,शांताराम जाधव,वाडीलाल चव्हाण,ममराज राठोड,राहुल राठोड,अंकुश राठोड,कपिल धामणे,सूचित तिवारी,विक्रांत तिवारी,श्रीकांत भामरे व स्वप्नील येवले या समाजबांधवांची उपस्थिती होती व यांच्या स्वाक्षरीनिशी असलेले निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here