जळगाव (संपादक सुनिल पाटील) – इंडियन रेडक्रॉस सोसायटी व ईकरा संस्थेच्या पुढाकाराने – ऑक्सिजनची लाईनची उपलब्धता
करून जळगाव जिल्ह्यातील 02 ऑक्सिजन सुविधेसह पहिले शंभर बेडचे कोविड हॉस्पिटलचे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांचे शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आज रोजी 50 ऑक्सिजनची लाईन सुरु करण्यात आली असून एक दोन दिवसात आणखी 50 ऑक्सिजनची लाईन सुरु होणार आहे त्यामुळे कोविड – 19 अंतर्गत ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा स्वरूपातील कोरोना ग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु केले जाणार असून या उपचाराने कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात भरीव वाढ होणार आहे.
100 रुग्णांना एकाच वेळेस ऑक्सिजन लाईनच्या माध्यमातून उपचार सुरु करण्यासाठी ज्यांनी प्रयोजकत्व घेतले – रजिस्ट्रार सुरेश पाटील, ओमप्रकाश केशवाणी, योगेश खांबीया, अनिल कांकरिया, बिट्टूभाई सालार यांचा मा. जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते सन्मान / सत्कार करण्यात आला.
कोरोना – 19 जागतिक महामारीमुळे उद्भवलेल्या प्रसंगी जळगाव शहरात कोविड – 19 ची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. ज्या रुग्णांना श्वासोश्वासात घेण्यास त्रास होतो, त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची लाईन असलेली ओ 2 युक्त हॉस्पिटलची आवश्यकता होती. आता या हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनची लाईन असलेली ओ 2 यंत्रणा सुरु झाल्यामुळे कोविड – 19 च्या रुग्णावर प्रभावीपणे उपचार करणे सोपे झाले आहे. ज्यांनी ज्यांनी या कामी योगदान दिलेले आहे यात इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा, जळगाव व इकरा संस्थेने घेतलेल्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यातील पहिले 100 बेडचे ईकरा कोविड हॉस्पिटल – ऑक्सिजन लाईन युक्त और हॉस्पिटल सेंटर सुरु करणे शक्य झाले व यामुळे कोविड – 19 रुग्णांना उपचार करणे सहज व सोपे झाले असून अशाच स्वरूपात समाज बांधवांनी मोठया मनाने दातृत्व भाव दाखविण्याची आवश्यकता आहे असे भावनिक आवाहन लोकार्पण सोहळा अर्पण प्रसंगी करण्यात आले.
या प्रसंगी विशेष प्रमुख अतिथी – अप्पर जिल्हाधिकारी – महाजन सर, अतिरिक्त तथा निवासी जिल्हाधिकारी – राहुल पाटील, सतीश कुलकर्णी – आयुक्त, महानगरपालिका, अतिरिक्त जिल्हाधिकारी व नोडल ऑफिसर – गोरक्ष गाडीलकर, जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, डॉ. निकुंभ – डीन – शासकीय मेडिकल कॉलेज, जळगाव, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक, इकरा कॉलेजचे व्हाइस प्रिन्सिपल डॉ.शोहेब शेख, संदीप काबरा, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, अनिल कांकरिया रक्तपेढी सचिव, ईकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.अ. करीम सालार, सचिव – हाजी अ. गफ्फार मलिक, सदस्य – डॉ. इकबाल शाह ( थीम कॉलेज चेअरमन) माजीद झकेरिया – (आय.टी.आय. चेअरमन, ईकरा मेडिकल कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपॉल, कॅम्पस इन्चार्ज – अफजल शेख, अभियंता, इंजि. बाकीद देशमुख हे होते व विशेष उपस्थिती – जननायक फेडरेशनचे फिरोज पिंजारी, अँड. शरीफ शेख, ईकरा हायस्कूल प्रिन्सिपॉल डॉ. हारून बशीर शेख, अलफैज सोसायटीचे चेअरमन – अजिज सालार उपस्थित होते.







