बिडीओ व विस्तार अधिकारी यांनीच सोशल डिस्टन्स चा केला फज्जा

वाशिम (पंढरी गायकवाड) – दि. १४ जुलै २०२०, दुपारी १२ वा ५ अहवाल पॉझिटिव्ह ५ व्यक्तींना डिस्चार्ज ,कारंजा शहरातील माळीपुरा परिसरातील ०३ व्यक्ती तसेच मालेगाव शहरातील शेलू फाटा परिसरातील ०१, नागरतास रोड परिसरातील ०१ अशा एकूण ०५ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, वाशिम व रिसोड तालुक्यातील प्रत्येकी ०१ आणि मालेगाव तालुक्यातील ०३ व्यक्ती अशा एकूण ०५ व्यक्तींना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अशी भयंकर कोरोना महामारीची परिस्थिती असून एकीकडे जनता कर्फ्यु असताना व देशात महाराष्ट्रमध्ये लॉकडाऊन असताना ,विस्तार अधिकारी लोखंडे व बिडीओ ज्योती यांनी सर्व शासनाचें नियम धाब्यावर बसवून शेकडो शासकीय कर्मचारी, अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती
मालेगाव पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सोशल डिस्टन्स धुळीस मिटवले,मालेगाव तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामपंचायत ऑपरेटर यांना बोलावून घेतली विनापरवाना मोठी बैठक,बैठकीत झाले जनता कर्फ्यु चे उल्लंघन
१४ वित्त आयोगाच्या बैठकीत सोशल डिस्टन्स चा फज्जा, सरकारी कर्मचाऱयांनी केला शासनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन पत्रकार गायकवाड यांनी विस्तार अधिकारी BDO ज्योती व लोखंडे यांना विचारणा केली असता विस्तार अधिकारी यांनी टाळाटाळ केली कुठलेही उत्तर मिळाले नाही
मालेगाव मध्ये ३ दिवसीय जनता कर्फ्यु ला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला आहे,१३ जुलै ला मालेगाव शहरामध्ये जनता कर्फ्यू ला सुरुवात झाली सर्व व्यापारी व शहरातील नागरिक यांच्यावतीने व सामाजिक राजकीय सर्वच माध्यमातुन जनता कर्फ्यू ला सहकार्य करून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे परंतु सरकारी कर्मचारी व अधिकार्यांनीच जनता कर्फ्यु व शासनाच्या सोशल डिस्टन्स चे सर्रासपणे उल्लंघन केले, शासनाच्या नियमाचे वेळोवेळी पालन केले तर नक्कीच या कोरोनाच्या महामारी पासून सर्व सुरक्षित राहू, कोरोना ला जर देशातून हद्दपार करायचे असेल तर देशातील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोनाला हरवण्यात आपण यशस्वी होऊ, हा तीन दिवस जनता कर्फ्यु सर्व जनतेने स्वतः लागू केला आहे , खरोखरच जनतेचे आभार व सर्वांनी असेच सहकार्य करावे
परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांनीच शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले? त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार..?आज मालेगाव मध्ये ५ कोरोना चे रुग्ण आढळून आले असतात विस्तार अधिकारी व बीडीओ कवडदेवी यांनी लोकडाऊन मध्ये शेकडो शासकीय कर्मचारी उपस्थित करून सोशल डिस्टन्स पायधुळीस टाकून फज्जा केला..?विस्तार अधिकारी व बीडीओ यांच्यावर कारवाई करण्यात यावी शासनाने याची दखल घेतली पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here