गावठी कट्यासह सहा महिन्यांपासून फरार सहआरोपी बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात

bhusawal-crime

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – दि.29.6.2020 रोजी भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग 6 गु.र.न 674/2020 आर्म अँक्ट 3/25 दाखल करण्यात आला त्यातील मुख्य आरोपी अरबाज आरीफ पटेल (वय 22 रा.पटेल कॉलनी जाममोहल्ला भुसावळ) यास अटक करुन त्या जवळुन 20.000/- रु.कि.चा एक गावठी कट्टा ताब्यात घेतला व सदर गुन्हयातील सह आरोपी जितेंद्र बबलु पथरोड (वय 24 रा.वाल्मीक नगर जामनेर रोड भुसावळ) हा 6 महीन्यांन पासुन फरार होता.

दि.24.1.2021 रोजी संध्याकाळी 17:00 वा.सुमारास भुसावळ शहरात डेली आठवडे बाजार येथील डिस्को टावर जवळ आरोपी जितेंद्र बबलु पथरोड हा आला असल्याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय वि.पो.अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे स.पो.नि.कृष्णा भोये , स.पो.नि.गणेश धुमाळ, स.पो.नि अनिल मोरे, स.पो.नि मंगेश गोटला सफौ.तस्लीम पठाण पो.हे.कॉ.जितु पाटील,जयेंद्र पगारे पो.ना अनिल पाटील,रमन सुरळकर,उमाकांत पाटील पो.कॉ कृष्णा देशमुख ,विकास सातदिवे ,सचिन चौधरी,ईश्वर भालेराव ,प्रशांत परदेशी,रविंद्र तायडे,योगेश माळी,प्रशांत सोनार यांनी लगेचच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि कृष्णा भोये करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here