शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील खंडोबाची सर्वात मोठी यात्रा मानली जाते. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होत असते व लाखो संख्येने भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात. ही यात्रा शहादा तालुक्यातून सर्वात मोठी यात्रा मानली जाते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी २८ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होणार होती. पण यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रशासनाच्या आदेशान्वये आणि गावकऱ्यांच्या निर्णयाने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे म्हणून त्यामुळे अनेकांना रोजगारांवर पाणी सोडावे लागणार आहे. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात रूग्णांची संख्या विढतच आहे. शहादा शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात काथर्दे गावातील जागतीज्योत खंडोबाची यात्रा प्रशासन व गावकऱ्यांच्या निर्णयाने रद्द करण्यात आली आहे.
२८ जानेवारी रोजी खंडोबाच्या मंदिरात यात्रेनिमित्त फक्त पूजाविधी केली जाईल त्यामुळे भाविकांना उपाय योजना केली जाणार आहे मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची ही काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे छोटे मोठे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे गेल्या ३०० वर्षापासून चालत आलेली परंपरेनुसार दरवर्षी काथर्दे येथे शाकंभरी पौर्णिमेला खंडोबाच्या यात्रेनिमित्त बारा गाड्यांची लांगळ ओढली जात असते हेच या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य मानले जाते म्हणून लाखो संख्येने भाविक येत असतात पण नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीमुळे या वर्षी जिल्हाधिकारींच्या आदेशाचे पालन करत काथर्दे येथील नागरिक व ट्रस्टच्या वतीने आणि ग्रामपंचायत कडून यात्रा रद्दचा निर्णय घेण्यात आला म्हणून काथर्दे येथील ग्रामसेवक एस.आर.सरदार,सरपंच गोरख भील, उपसरपंच गुलझारसिंग गिरासे, पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे, ट्रस्ट अध्यक्ष गुलाबसिंग गिरासे, उपाध्यक्ष लिंबा दाजभाऊ गिरासे, ट्रस्टचे चेअरमन भिमसिंह गिरासे, केसरसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.







