केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन

ramdas-athvale

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले उद्या सोमवार (दि.२५ जानेवारी रोजी) ५ दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना होणार आहेत. दि. २६ जानेवारी रोजी भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन रामदास आठवले दुबईत साजरा करणार आहेत.

दि. २६ जानेवारी रोजी सकाळी दुबईतील अल हमरिया; डिप्लोमॅटीक इन्कलेव्ह येथील भारतीय उच्चायुक्तालयात केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारतीय तिरंगा राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून ७२ वा प्रजसत्ताक दिन दुबईत साजरा करण्यात येणार आहे.

संयुक्त अरब अमिरतीत दुबई आणि अबुधाबी या शहरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार आहेत. पाच दिवस आठवले संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here