वाहनचालकांना दमदाटी करून पैसे उकळणाऱ्या 13 तृतीयपंथीयावर कारवाई

cp-office-pune-city

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तेरा तृतीयपंथीयावर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली.

पुणे शहरातील चौकाचौकात सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना तृतीयपंथीयांकडून दमदाटी करून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकाचौकात भिक्षा मागणाऱ्या तृतीयपंथीयांची पडताळणी केली.

नंतर येरवड्यातील सादलबाबा चौकी, लोणी टोल नाका हडपसर, घड्याळ चौक बंडगार्डन, महालक्ष्मी मंदिर स्वारगेट आणि करिष्मा चौक अलंकार या ठिकाणी 13 तृतीयपंथीयावर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम (41) अन्वये कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here