‘धाकड’ मधील दिव्या दत्ताचा लूक रिलीज

dhakad

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – कंगना रणौतचा आगामी चित्रपट धाकड हा एक मेगा अ‍ॅक्शन-एंटरटेनर असून मोठ्या ‘स्केल’ वर बनविला जात आहे. यात कंगना महिला सिक्रेट एजन्टच्या भूमिकेत असेल व पहिल्यांदाच बॉलिवूडमधील एखादी नायिका अशी भूमिका साकारताना दिसेल. निर्माते-दिग्दर्शकाच्या मते ‘धाकड’ मधून महिला कलाकारांची मुख्य भूमिका असलेला अ‍ॅक्शन चित्रपट बनविण्याचा ट्रेंड सुरु होईल. कारण जगातील कोणत्याही ॲक्शन चित्रपटाला समर्थपणे टक्कर देऊ शकेल, अशी ॲक्शन-दृश्ये या चित्रपटात दिसणार आहे व हे सर्व एक महिला सिक्रेट एजंट अग्नी, जी भूमिका कंगना रणौत करीत आहे, करताना दिसणार आहे.

dhakad-movie

दिव्या दत्ता चित्रपटातील तिचा रोहिणीचा खतरनाक लूक प्रदर्शित करताना म्हणाली की, ‘रोहिणी म्हणून माझा लूक सादर करत आहे. ती किती वाईट असू शकते याचे वर्णन देखील करत नाही.’ सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, असायलम फिल्म्स आणि सोहेल मकलाय प्रॉडक्शन्स निर्मित ‘धाकड’ चे दिग्दर्शन रजनीश (रेझी) घई याने केले आहे.dhakad-divya-datta

कंगना रणौतसोबत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता, महाअक्षय चक्रवर्ती, मनोज तिवारी आदी महत्त्वपूर्ण भूमिकांतून दिसतील. ‘धाकड’ येत्या दिवाळीत १ ऑक्टोबर २०२१ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here