नवी दिल्ली – एका लोकप्रिय पॉर्न वेबसाईटचा डेटा लीक झाला आहे. ज्यामध्ये युजर्सचे नाव, ई-मेल आयडी सारखी खासगी माहिती लीक झाली आहे. हॅकर्स हा डेटा युजर्सला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा सायबर हल्ला करण्यासाठी वापरू शकतात. CyberNews च्या रिपोर्टनुसार, MyFreeCams नावाच्या पॉर्न वेबसाईटचा डेटा लीक झाला आहे. लीक डेटामध्ये जवळपास 20 लाख युजर्सची खासगी माहिती आहे. ज्यामध्ये युजर्सचे ई-मेल आयडी, नाव आणि पासवर्ड समाविष्ट आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्स एका प्रसिद्ध फोरमवर युजर्सचा डेटाबेस विकत आहेत. येथे 10 हजार युजर्सच्या डेटाच्या मोबदल्यात बिटकॉइनच्या स्वरूपात 1500 डॉलर्सची मागणी केली जात आहे. असे बोलले जात आहे की, 10 हजार युजर्सचा डेटा खरेदी करणारे त्यातून किमान 10 हजार डॉलर्स कमवू शकतात. डेटा लीक झाल्याची माहिती स्वतः या वेबसाइटने मान्य केली असून त्यांनी सर्व युजर्सचे पासवर्ड रिसेट केल्याचं सागितलं आहे.
MyFreeCams ही एक प्रसिद्ध पॉर्न वेबसाईट आहे. ज्याचे जवळपास 7 कोटी युजर्स आहेत. ही 27 व्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय प्रौढ साइट आहे. आपण देखील MyFreeCams चे युजर्स असाल तर आपण आपला यूजरआयडीचा पासवर्ड शक्य तितक्या लवकर बदला.







