आजही आपल्या बोल्डनेसने रसिकांना घायाळ करते रिया सेन

riya-sen

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री रिया सेन आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी 1981 रोजी कोलकाता येथे झाला होता. रिया सेनने तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ती सध्या मोठ्या पडद्यावरून गायब आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

riya-1

रिया सेनच्या वाढदिवशी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत, हे फोटो तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. 40 वर्षांच्या रियाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, ती वयापेक्षा खूपच तरुण दिसते. रिया भलंही बॉलीवूड आणि चित्रपटांपासून दूर गेली असेल, पण ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

riya-4

riya-2

रिया सेनने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. रियाचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. इन्स्टाग्रामवर रिया सेनचा हा बोल्ड लुक सर्वांनाच आवडत आहे. या फोटोंवर रियाला लाखो लाईक्स मिळाल्या असून चाहते तिच्या फोटोंवर सतत करतानाही दिसत आहेत.

riya-3

रिया सतत तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फोटो शेअर करत असते. तिच्या नवीन फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.तिला इन्स्टाग्रामवर 13 लाखाहून अधिक लोकं फोल्लो करतात. (फोटो साभारः Instagram @riyasendv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here