महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने अलिबाग येथे कृषी सेमिनार व प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन

mango-manufacture-seminor

अलिबाग-सोगावकर – शेतकऱ्यांनी आंबा,भात, नाचणी, सफेद कांदा, तोंडली,वाल आदी पिकांवर येणाऱ्या खर्चाचा हिशोब योग्य प्रकारे करून पीक घेतल्यास निश्चितच फायदा होतो, असे श्रीमती उज्वला बाणखेळे,जिल्हा कृषी अधिकारी यांनी जिल्हास्तरीय कृषी सेमिनार, परहूर-अलिबाग येथे उदघाटनीय भाषणात २३ जानेवारी रोजी केले.

सेमिनारच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल हे होते,आपल्या मार्गदर्शनात त्यांनी कोकणातील आंबा उत्पादक मागील चार-पाच वर्षे वातावरण बदल यामुळे अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, तापमान यामुळे मावा तुडतुडा,भूरी,क्रिप्स रोग आधी समस्या झेलत आहेत, उत्पादन अवघे ३२ ते ४० टक्क्यांवर आले आहे, दुसरीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे विक्री व्यवस्थेत व्यत्यय आल्यामुळे त्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान या वर्षी झाले आहे,अशातच आंबा फळ पीक विम्याची प्रमाणके बदलल्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे, त्यांच्या या समस्याचे आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले,पुढे बोलताना त्यांनी एपीएमसीला काही ही अंशी पर्याय म्हणून कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र व आंध्र कर्नाटकच्या आंब्यांचे आक्रमण थांबविण्यासाठी कोकण हापूसचे ब्रँडिंग करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

krushi-pradarshan-at-alibaugसेमिनारसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.एफ लि. मुंबई चे व्यवस्थापक विलास पाटील हे उपस्थित होते, आर.सी.एफ. मार्फत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवित येत असणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिली.
प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतात सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर मातीचे परीक्षण करून उपयोगात आणले तर निश्चित ७० ते ८० टक्के उत्पन्न वाढू शकते, असे आर.सी.एफ.थळ चे वरिष्ठ व्यवस्थापक (कृषी) हेमंत गुरसाळे यांनी आपल्या भाषणात सांगून आर.सी.एफ.च्या खतांची विस्तृत माहिती दिली.

यु.पी.एल लि.चे एस.बी.यु.मार्केटिंग हेड दृष्यन्त त्रिवेदी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आपल्याला जीवनात प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची गरज लागते, शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या यू.पी.एल. कंपनीच्या उत्पादनाची व उपयोगाची माहिती विषद केली, तसेच नर्रचर ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करा व अधिक प्रमाणात वेळोवेळी माहिती घ्या असे शेवटी सांगितले. यु.पी.एल. लि. मार्केटिंग मॅनेजर पुणे विभाग संदीप राऊत यांनी स्क्रीनवर कंपनीच्या तुडतुडा,मावा या कीटकांचे आक्रमण रोखणे बरोबरच उत्पादन वृद्धी कशी वाढविता येईल ,याबाबत सविस्तर सादरीकरण केले.

महाराष्ट्र शासनाच्या महा ऊर्जा(मेडा) च्या विविध सौर उपकरणे व योजनांची माहिती मेडा सहव्यवस्थापक घोरपडे यांनी उपस्थितांना दिली. या सेमिनार ठिकाणी आर.सी.एफ, यूपीएल, महाऊर्जा मेढा, विमा, खते व बी बियाणे आदींचे स्टॉल उभारण्यात आले होते. पशुवैद्यक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचे सत्कार यावेळी करण्यात आले.सेमिनारचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले तर अडव्होकेट जयेंद्र गुंजाळ यांनी आभार प्रदर्शन केले. सेमिनार व प्रदर्शनास अलिबाग व रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – कृषी सेमिनारला मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेळे, डावीकडून आर.सी.एफ लि.थळ चे व्यवस्थापक(कृषी).हेमंत गुरसाळे, आर.सी.एफ लि.मुंबईचे व्यवस्थापक विलास पाटील,महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल,यूपीएल लि.चे एस.बी.यु.आर मार्केटिंग हेड दृष्यन्त त्रिवेदी, यूपीएल लि.झोनल मार्केटिंग मॅनेजर पुणे संदीप राऊत छायाचित्रात दिसत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here