जावली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपाई च्या एकूण १४ उमेदवारांनी मारली बाजी

javali-grampanchyat

जावली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – रिपाईच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा रिपाई चे जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार व पेढे देऊन सत्कार करण्यात आला .

रिपाई (आ ) चे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्यातील अनेक ग्रामपंच्यातीमध्ये आरक्षित जागेवर रिपाई चे उमेदवार उभे करण्यात आले होते त्यापैकी १४ ठिकाणी उमेदवार निवडून आले .

जावली तालुक्यात रिपाई च्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असल्याने गावागावात मोठ्या प्रमाणात संघटन वाढवून कार्यकर्त्यांनी तालुक्यात ४२ शाखा निर्माण केलेल्या आहेत , समाज्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांच्या विरोधात रिपाई नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असल्याने जावली तालुक्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात रिपाई ( आ ) च्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रिपाईला प्रथमच मोठे यश मिळाले आहे .

याप्रसंगी अशोकराव बापू गायकवाड , जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे , जिल्हा उपाध्यक्ष शशी जाधव , किसनराव रोकडे , जॉन जोसेफ , तालुका उपाध्यक्ष हेमंत गायकवाड , विकास जाधव , अनिल शिंदे ,तालुका संघटक विजय शिंदे , बळवंत बगाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here