पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी जाणारा राष्ट्रीय दिन साजरा केला जातो.याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.
इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.
भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शुर वीर देशभक्तांन साठी विनम्र अभिवादन तथा कार्यसम्राट आमदार अँड अशोक बापु मित्र मंडळ यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा….







