अंबरनाथ येथे शिवसेना शहरप्रमुख मा.अरविंद वालेकर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन

balasaheb-thakare

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – जन्मदिवस एका अश्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी सर्व सामान्य मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं ! होय जन्मदिवस बाळ केशव ठाकरे नावाच्या वादळाचा ! दिनांक 23 जानेवारी 21 रोजी वॉर्ड क्र 35 व 36 च्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदूहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त शिवसैनिक अजय दादा मोहोरीकर व सौ. शामला ताई मचेकर यांच्या वतीने आदरणीय शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

अंबरनाथ शहराचा बुलंद आवाज म्हणून नावाजलेले आमचे लाडके व्यक्ती महत्व आदरणीय शिवसेना शहर प्रमुख अरविंदजी वालेकर व अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा ताई वालेकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपस्थित व नगरसेवक निखिल वालेकर , व माजी नगरसेवक सर्व उपस्थित होते

ambarnath-shivsena

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक व एकविरा आई ग्रुपचे अध्यक्ष अजय दादा मोहोरीकर व समाजसेविका सौ. शामला ताई मचेकर , सचिन मचेकर , शाखा प्रमुख संदीप कोरडे , संतोष जंगम ,विजय थाटे, सिद्धांत सूर्यवंशी , दिपक ठाकरे व एकविरा आई ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here