‘फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ विषयावर राष्ट्रीय परिषद 

futuristic-trend-in-education

पुणे (कार्यकारी संपादक निलेश बटाणे) – ‘सेंटर ऑफ एज्युकेशनल डेव्हलपमेंट ‘ (सीईडी )आणि कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्तपणे ‘फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ विषयावर राष्ट्रीय परिषद  आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद २७ जानेवारी रोजी सकाळी १०  पासून ऑन लाईन पार पडणार आहे.  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी चे संस्थापक राकेश मित्तल (पुणे ) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

seminor-shedule

ही सहावी वार्षिक राष्ट्रीय परिषद आहे .नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग ‘चे माजी अध्यक्ष  सी बी शर्मा,मालदीव चे शिक्षण मंत्री मरियम नासीर ,सीबीएसई चे सचिव अनुराग त्रिपाठी,दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिनेश सिंग यांच्यासह अनेक शिक्षण तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here