मुंबई (प्रतिनिधी) – जगभरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. केवळ पाच दिवसात जगात 10 लाख नवे रुग्ण सापडले आहे. हे प्रमाण चिंताजनक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख लोकांचा मृत्यु झाला आहे. प्रतिबंधात्मक नियम न पाळल्यास सामान्य परिस्थिती येणे कठिण असल्याचा इशारा संघटनेने दिले.
अमेरिकेत दिवसाला सरासरी 62 हजार रुग्ण सापडत आहेत: तर ब्राझीलमध्ये सरासरी 45 हजार रुग्णांची भर पडत आहे.भारतात दिवसा सरासरी 25 ते 28 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. तर रशिया, चिली, पेरु, मेक्सिको या देशामध्ये रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. नव्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे अमेरिका,ब्राझील,भारत या तीन देशातून आहेत.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला सरासरी 25 ते 28 हजारापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशात 28,598 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, 553 जणांचा मृत्यु झाला आहे. यासोबत देशात एकुण कोरोना बाधितांची संख्या 9,06,752 एवढी आहे. तर आतापर्यंत एकुण 23,727 जणांचा मृत्यु झाला आहे.







